घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:21+5:302021-02-13T04:21:21+5:30
................................ चोरट्यांनी चोरल्या शेळ्या अहमदनगर : कर्जत तालुक्यातील खुरांगेवाडी येथून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या चोरून नेल्या. ...

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
................................
चोरट्यांनी चोरल्या शेळ्या
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील खुरांगेवाडी येथून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या चोरून नेल्या. ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात कनलाल यादव शिंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेडकॉस्टेबल शेख पुढील तपास करीत आहेत.
.........................
दत्तात्रय पोटे यांची पोलीस
उपनिरीक्षकपदी नियुक्ती
अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धेत येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस कॉस्टेबल दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नगर तालुक्यातील बारदारी येथील शेतकरी कुटुंबातील पोटे हे २०१० मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी जामखेड, भिंगार कॅम्प व आर्थिक गुन्हे शाखेत सेवा केली. विविध गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. पोटे यांचे बंधूही पोलीस दलात कार्यरत आहेत. या निवडीबद्दल पोटे यांचे अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
फोटो १२ दत्ता पोटे
........................
सबस्टेशन परिसरातून ट्रान्सफॉर्मर चोरले
अहमदनगर : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी शिवारातील महावितरणच्या सबस्टेशन परिसरातून चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर चोरून नेले. ७ ते ८ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात महावितरणचे वरिष्ठ यंत्रचालक राहुलकुमार उशन्ना वरगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक ठाणगे पुढील तपास करीत आहेत.