घरफोडी करून दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:13+5:302021-05-23T04:21:13+5:30
---------------- मोटारसायकल चोरली अहमदनगर : नवनागापूर येथे घरासमोरून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली. २० ते २१ ...

घरफोडी करून दागिने चोरले
----------------
मोटारसायकल चोरली
अहमदनगर : नवनागापूर येथे घरासमोरून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली. २० ते २१ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्मिता सुधाकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.
--------------
चोराच्या वाडीतून चोरला वीजपंप
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज गावाच्या शिवारातील चोराचीवाडी येथे शेतातून चोरट्यांनी २७ हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरून नेला. २० ते २१ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी हरिदास नारायण अनभुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक खारतोडे हे पुढील तपास करत आहेत.
----------------
शेळीसह मोबाईलही चोरला
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील दिघी येथे घरासमोरून चोरट्यांनी ६ हजार रुपये किमतीची एक शेळी व एक मोबाईल चोरून नेला. २० ते २१ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात कारभारी काशिनाथ घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक देवकाते हे पुढील तपास करत आहेत.
-------------------