बंधाºयांच्या ६ हजार फळ्या गंजल्या
By मिलिंदकुमार साळवे | Updated: August 19, 2017 16:19 IST2017-08-19T16:06:25+5:302017-08-19T16:19:39+5:30
गोदावरी नदीवरील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील ६ हजार ३१४ लोखंडी फळ्यांवर गंज चढल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. लोखंडी फळ्या बदलण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर साडेपाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

बंधाºयांच्या ६ हजार फळ्या गंजल्या
अहमदनगर : गोदावरी नदीवरील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील ६ हजार ३१४ लोखंडी फळ्यांवर गंज चढल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. लोखंडी फळ्या बदलण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर साडेपाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. दरम्यान जलसंपदा विभागाने साडेपाच कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. गोदावरी नदीवरील एकूण १२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील लोखंडी फळ्या (बर्गे) गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वापरात आहेत. या बंधाºयात पूर्ण साठवण क्षमतेपर्यंत पाणी साठा होण्यासाठी ६ हजार १०४ लोखंडी फळ्या आवश्यक आहेत. सध्या फक्त ३ हजार ९६३ फळ्या चांगल्या स्थितीत आहेत. तर २ हजार १४१ फळ्या अत्यंत खराब झाल्या आहेत. त्यामुळे बंधाºयांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात अडचणी येत आहेत. या १२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात पूर्ण साठवण क्षमतेपर्यंत पाणी साठा झाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यासोबतच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे या गंजलेल्या फळ्या बदलून नवीन फळ्या खरेदी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी उपखोरे, गोदावरी कादवा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या १२ बंधाºयांच्या नादुरूस्त फळ्या काढून नवीन फळ्या बसविण्यासाठी विशेष दुरूस्ती अंतर्गत १ कोटी ८३ लाख ५२ हजार ६५२ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करुन हा निधी विभागाकडे देण्यात आला आहे. आश्वी, भेर्डापूर, चणेगाव, गळनिंब, मांडवे (पारनेर), कमालपूर, केसापूर, खानापूर, मालुंजे, मध्यमेश्वर प्रवरा, मांडवे (श्रीरामपूर),नांदूर खंदरमाळ, पाचेगाव, पढेगाव, पुनतगाव, रामपूर, वळदगाव, वांगी, देहरे या १९ बंधाºयांच्या दुरूस्तीसाठी ३ कोटी ५७ लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. पाचेगाव बंधाºयाच्या सर्वाधिक ५७५ फळ्या नादुरूस्त झाल्या आहेत.