टँकरच्या धडकेने बैलगाडीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:39 IST2021-02-28T04:39:37+5:302021-02-28T04:39:37+5:30

कोपरगाव : बैलगाडीस पाठीमागून येणाऱ्या भरधाव टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बैलगाडीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ...

Bullock cart rider killed by tanker collision | टँकरच्या धडकेने बैलगाडीस्वार ठार

टँकरच्या धडकेने बैलगाडीस्वार ठार

कोपरगाव : बैलगाडीस पाठीमागून येणाऱ्या भरधाव टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बैलगाडीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

विलास जिजाभाऊ पवार (वय ४०, रा. चौगाव बर्डी, ता. सटाणा, जि. नाशिक) असे मृत पावलेल्या बैलगाडीस्वाराचे नाव आहे. यात एक बैल दगावला, तर दुसरा जखमी झाला आहे. बैलगाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर टँकरचालक टँकर जागेवरच सोडून पसार झाला.

या प्रकरणी रमेश शंकर मोरे यांच्या फिर्यादीवरून टँकर (एमएच ११, एएल १५४९) चालकाविरुद्ध (नाव, गाव माहीत नाही.) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के करीत आहेत.

Web Title: Bullock cart rider killed by tanker collision