बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:27+5:302021-06-26T04:16:27+5:30
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे ...

बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनील काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदीप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, आदींसह टपरीधारक उपस्थित होते.
शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत (मुलांची) चारही बाजूने टपरीधारक विविध व्यवसाय करीत आहेत. सर्व टपरीधारकांकडून अधिकृतरीत्या नगरपरिषदेला कर पावतीचा प्रतिदिन भरणा केला जात आहे. सदरील शाळेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हा परिषदेला सादर केला होता. परंतु, त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. त्याऐवजी प्रशासन काही जागा ९९ वर्षांच्या करारावर देत आहेत. या करारास सर्व टपरीधारकांचा विरोध असून, ९९ वर्षांच्या करारावर मंजुरी देणे म्हणजे टपरीधारकांची रोजंदारी बंद करून उपासमारीची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे
९९ वर्षांच्या करारावर मंजुरी देण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करून त्या ठिकाणी २०१७ च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे, टपरीधारकांना प्राधान्याने गाळे देऊन उर्वरित गाळ्यांचा लिलाव करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा सर्व टपरीधारक १ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.-
फोटो - २५शेवगाव निवेदन
शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले.