कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:43+5:302021-02-05T06:39:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवून बाजार ...

कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवून बाजार समित्यांचा पाया भक्कम केला जाणार आहे. एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीने जोडून व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शेतीमाल प्रक्रिया उद्योग, सात मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क आणि लघुउद्योगातून रोजगार उपलब्ध होईल. उत्पादन क्षमता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार डॉ. विखे म्हणाले, कोविड संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीनंतर सादर झालेला अर्थसंकल्प लघुउद्योगांना नव्या संधी देणारा आहे. या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखणारा हा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी ग्रामीण भागासाठी असलेल्या योजना शहरांसाठी लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शहरातील पाणी योजना सक्षम होऊ शकतील. ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांवर अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात केलेल्या आर्थिक तरतुदीमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल. या माध्यमातून जिल्हा स्तरावर अद्ययावत आरोग्य केंद्राची उभारणी करणे सोपे होईल. कोविड लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात केलेल्या नवीन योजना ग्रामीण भागातील शिक्षणासाठी नवी दिशा देण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल क्रांतिकारी आहे, असे विखे म्हणाले.
...
अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी
- एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीने जोडणे
- शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभे करणे
- सात गुंतवणूक पार्क उभारणे
- लघु उद्योगातून रोजगार निर्मिती करणे
- शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखण्याचा प्रयत्न
-आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना
...