आरक्षणासह महागाईविरोधात बसपाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:27+5:302021-07-14T04:24:27+5:30
केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी वाहनांना धक्का ...

आरक्षणासह महागाईविरोधात बसपाचा मोर्चा
केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी वाहनांना धक्का मारीत कार्यकर्ते या मोर्चात उतरले. यावेळी बसपाचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनील ओव्हळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, सुनील मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अॅड. बाळकृष्ण काकडे, विधानसभा बीव्हीएफ अतुल काते, जिल्हा सचिव बाळासाहेब मधे, जाकीर शहा, माधव त्रिभुवन, सरपंच धनंजय दिंडोरे, बाबासाहेब वीटकर, योगेश ससाणे, राहुल पंडागळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
------
फोटो - १३बसपा मोर्चा
विविध मागण्यांसाठी मंगवळवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.