लाडक्या बहिणीला भावांनी फेसबुकवर दिला अखेरचा निरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 13:13 IST2020-05-05T13:12:56+5:302020-05-05T13:13:32+5:30

श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे) सकाळी अंत्यसंस्कार समयी फेसबुकवर तिला अखेरचा निरोप दिला.

The brothers sent their last message to their dear sister on Facebook | लाडक्या बहिणीला भावांनी फेसबुकवर दिला अखेरचा निरोप 

लाडक्या बहिणीला भावांनी फेसबुकवर दिला अखेरचा निरोप 

श्रीगोंदा : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे) सकाळी अंत्यसंस्कार समयी फेसबुकवर तिला अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून बहिणीला अखेरचा दंडवत केला. 
श्रीगोंदा येथील भीमराव घोडके यांना अनिल, बाबासाहेब, सूर्यकांत, मीना, वैजंता, शोभा असे तीन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.  वैजंता सर्व भावंडाची लाडकी बहीण होती. काही दिवसांपासून वैजंता आजारी होती. लॉकडाऊनमुळे तिला कोणालाही भेटायलाही जाता आले नाही. सोमवारी तिने शेवटचा श्वास घेतला. ही दु:खाची बातमी समजली. तिच्या अंत्यविधीला जाण्याची सर्वांची खूप इच्छा होती.  पण काय करणार? अखेर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्काराचा सोहळा फेसबुकवर लाईव्ह करण्यात आला. घोडके परिवाराने श्रीगोंद्यातून तिला अखेरचा निरोप दिला. वैजंता तु आम्हाला पुन्हा भेटणार नाही म्हणून दाटलेल्या भावनांना सर्वांनी अश्रूंरुपी वाट मोकळी करून दिली.

Web Title: The brothers sent their last message to their dear sister on Facebook