शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिराची भावजयसोबत लग्नगाठ, वहिनीला आधार देत चिमुकलीसाठी बनला 'बापमाणूस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 09:57 IST

कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजय आणि तिची १९ महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले

अकोले : एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिलीही असेल. पण, एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली. भावाच्या निधनानंतर वहिनी आणि पुतणीचं पालकत्व स्विकारणाऱ्या भावाचा आदर्श लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे. भावाचा मोठेपणा, वहिनीचा सामंजस्यपणा आणि कुटुंबीयांनी दाखवलेली समजूतदारी यामुळे हा लग्नसोहळा भावाच्या निधनाचे दु:ख काही काळ बाजूला सारत आनंदी वातावरणात पार पडला.

कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजय आणि तिची १९ महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले. या कुटंबातील समाधान याने मनाची हिम्मत बांधत आपल्या चिमुकल्या पुतणीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.  चुलते, वडिल आणि सहविचाराने भावजयीबरोबर लग्नगाठ बांधली. रविवारी ३० जानेवारी रोजी म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्नसोहळा पार पडला. विधवा वहिनीसोबत लग्न करुन दीराने समाजात भान जपले. तालुक्यातील ढोकरी येथील निलेश कारभारी शेटे (31) यांचे 14 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते. आश्रमशाळेतील मुले, शिक्षक कोरोनाबाधित झाले. त्यात निलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असतानाच त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची 23 वर्षांची पत्नी पूनम आणि 19 महिन्यांची चिमुकली आणि सर्व कुटुंब दु:खाच्या खाईत लोटले गेले.  

या अपघातातून सावरण्यासाठी घरातील समाधान कारभारी शेटे या 26 वर्षीय तरुणाने वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते सीताराम शेटे, सामाजिक कार्यकर्ते माधव तिटमै, भाऊ मंगेश शेटे, पुनमचे माहेरकडील टाहाकारी येथील एखंडे कुटुंब यांनी सकारात्मक विचार केला.विधवा मुलीची व सर्व कुटुंबाची मानसिकता तयार केली. रविवारी (दि. ३० जानेवारी) जानेवारी २०२२ ला हा विवाह योग जुळून आला. म्हाळादेवी खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्न सोहळा पार पडला. 

प्रांगणातच पार पडला लग्न सोहळा

प्रांगणात कोरोना नियम पाळत हा लग्न सोहळा पार पडला. विधवा वहिनीबरोबर कारभारी शेटे (वय ३१) यांचे १४ ऑगस्ट या आघातातून सावरण्यासाठी सोहळा पार पडला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarriageलग्नWomenमहिला