ब्रिजलाल बिकचंदानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:27+5:302021-04-18T04:20:27+5:30
यमुनाबाई मोरगे श्रीरामपूर : यमुनाबाई गंगाधर मोरगे (वय ७४) यांचे दि. १६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

ब्रिजलाल बिकचंदानी
यमुनाबाई मोरगे
श्रीरामपूर : यमुनाबाई गंगाधर मोरगे (वय ७४) यांचे दि. १६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे, नातसून असा परिवार आहे. बाबासाहेब व दादासाहेब गंगाधर मोरगे यांच्या मातोश्री, तर निलेश व गणेश मोरगे यांच्या त्या आजी होत.
---------
लक्ष्मीबाई निवृत्ती मोरे
श्रीरामपूर : शहरातील लक्ष्मीबाई निवृत्ती मोरे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त सरकारी ऑडिटर निवृत्ती मोरे यांच्या पत्नी तर सुनील, संजय मोरे, विमल पवार, भारती सोनवणे यांच्या त्या मातोश्री व माजी नगरसेविका राघेश्वरी सुनील मोरे यांच्या त्या सासू होत.
--------
सुरेखा नानासाहेब जौक
श्रीरामपूर : शहरातील सुरेखा नानासाहेब जौक (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दीर, पुतणे, सून व नातवंडे असा परिवार आहे. नानासाहेब जौक यांच्या पत्नी, बांधकाम अभियंता सचिन जौक यांच्या मातोश्री तर बापूसाहेब (वसंतराव) जौक यांच्या भावजयी होत.