मुलीवर अत्याचार करणा-या पित्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:46 IST2018-10-20T15:45:34+5:302018-10-20T15:46:02+5:30
आठ वर्षे वयाच्या पोटच्या मुलीवर वांरवार लंैगिक अत्याचार करणा-या पित्यास कोपरगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुलीवर अत्याचार करणा-या पित्यास जन्मठेप
राहाता : आठ वर्षे वयाच्या पोटच्या मुलीवर वांरवार लंैगिक अत्याचार करणा-या पित्यास कोपरगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय सहा हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
१९ जून २०१७ रोजी अस्तगाव येथील हरिष रंगनाथ देसाई ( वय - ३२) याने आपल्या राहात्या घरी आठ वर्षाच्या स्वत: च्या मुलीवर दमदाटी करुन वारंवार लंैगिक छळ केला. पिडीत मुलीच्या आईने आपल्या पतीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा राहाता पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पंकज व्यवहारे, अशोक गांगड, बाळू गायकवाड यांनी तपास करुन कोपरगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकिल बापूसाहेब पानगव्हाने यांनी काम पाहिले. आज कोपरगाव कोर्टाचे न्यायाधीश एन. एन. श्रीमंगले यांनी आरोपीस जन्मठेप, सहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली.