मुलांच्या बौद्धिक विकासवर मंथन
By Admin | Updated: October 16, 2016 01:04 IST2016-10-16T00:27:20+5:302016-10-16T01:04:42+5:30
अहमदनगर : जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने पाळण्यापासून ते रंगीत खडूपर्यंत या विषयावर येथे आयोजित कार्यशाळेत मुलांचा बौद्धिक

मुलांच्या बौद्धिक विकासवर मंथन
अहमदनगर : जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने पाळण्यापासून ते रंगीत खडूपर्यंत या विषयावर येथे आयोजित कार्यशाळेत मुलांचा बौद्धिक विकास व वर्तमान समस्यांवर मंथन करण्यात आले़ या कार्यशाळेत राज्यभरातील ७५ बालरोगतज्ज्ञांनी सहभाग घेतला होता़
कार्यशाळेत नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील बालकांना आवाज व प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून वातावरण कसे असावे़ बौद्धिक विकासाची सुरुवात जन्मता: करणे का गरजेचे असते, या विषयावर कोल्हापूर येथील डॉ़ संतोष निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले़ लसीकरणाबरोबर बालरोगतज्ज्ञांनी कोणते बौद्धिक विकासाचे टप्पे लक्षात ठेवावे, अस्थिर मुले कसे ओळखावे यावर डॉ़ सुनील गोडबोले यांनी मार्गदर्शन केले़ ओपीडीत कोणत्या बौद्धिक चाचण्या घेऊ शकतो़ प्रमाणित चाचण्यांचा वापर कसा करावा, स्वकेंद्रित मुले कशी ओळखावीत यावर डॉ़ माधवी शेळके यांनी मार्गदर्शन केले़ बालरोगतज्ज्ञांनी बालकांचे शारीरिक आजार बरे करताना बौद्धिक विकासाचे टप्पे लक्षात ठेवून लवकर हस्ते करण्याची गरज असल्याचे मत संघटनेचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप बागल यांनी व्यक्त केले़ डॉ़ सुचित तांबोळी यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले़ डॉ़ शहनाज अयुब यांनी सूत्रसंचलन केले़ डॉ़ शर्वरी पारगावकर यांनी आभार मानले़ यावेळी डॉ़ जयदीप देशमुख, डॉ़ सुनील गोडबोले, डॉ़ संतोष निंबाळकर आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)