बोथरा यांना समाजभूषण पुरस्कार
By Admin | Updated: January 14, 2016 22:46 IST2016-01-14T22:44:12+5:302016-01-14T22:46:55+5:30
अहमदनगर : आनंदऋषिजी हॉस्पिटलचे विश्वस्त व बोथरा उद्योग समूहाचे संचालक संतोष बोथरा यांना नाशिक येथील अखिल भारतीय मारवाडी व गुजराती मंचतर्फे देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे़

बोथरा यांना समाजभूषण पुरस्कार
अहमदनगर : आनंदऋषिजी हॉस्पिटलचे विश्वस्त व बोथरा उद्योग समूहाचे संचालक संतोष बोथरा यांना नाशिक येथील अखिल भारतीय मारवाडी व गुजराती मंचतर्फे देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे़ या पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि़१६) होणार आहे, अशी माहिती गुजराती मंचचे अध्यक्ष अजित बागमार यांनी दिली़ आनंदऋषिजी हॉस्पिटल, जैन श्रावक संघ, जैन सोशल फेडरेशन, रेल्वे सल्लागार तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून बोथरा हे भरीव समाजकार्य करीत आहेत़ (वा़प्ऱ)