बोठेची कोट्यवधींची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:44+5:302021-02-07T04:19:44+5:30

हत्याकांडाच्या गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बोठे फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी स्टॅडिंग वॉरंट काढून देशभरातील पोलीस स्टेशनकडे पाठविले आहे. ...

Bothe's property worth crores is on the radar of the police | बोठेची कोट्यवधींची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर

बोठेची कोट्यवधींची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर

हत्याकांडाच्या गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बोठे फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी स्टॅडिंग वॉरंट काढून देशभरातील पोलीस स्टेशनकडे पाठविले आहे. स्थानिक गुन्हे शाखाही त्याचा शोध घेत आहे. एवढे करूनही बोठे सापडत नाही. त्यामुळे पोलीस आता पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविणार आहेत. यामध्ये बोठे याला फरार घोषित करून त्याच्या मालमत्ता जप्तीसाठी लवकरच न्यायालयात अर्ज केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बोठे याच्या शहराच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची महापालिका, नगरपालिका तर गावाच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची महसूल विभागाकडून माहिती घेतली जात आहे.

................

बोठेच्या पार्टनरशीपचीही चौकशी

बाेठे याच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्ता तसेच तो एखादी आर्थिक संस्था, कंपनीत कागदोपत्री हिस्सेदार असेल तर त्याचीही चाैकशी होऊन जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Bothe's property worth crores is on the radar of the police