घाटनांदूर येथील मुरंबी धरणात दोघांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:43+5:302021-09-02T04:46:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर (जि. बीड) : येथून जवळच असलेल्या मुरंबी धरणात मासे पडण्यासाठी गेलेल्या दोघांना जलसमाधी मिळाली आहे. ...

Both were buried in Murambi dam at Ghatnandur | घाटनांदूर येथील मुरंबी धरणात दोघांना जलसमाधी

घाटनांदूर येथील मुरंबी धरणात दोघांना जलसमाधी

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर (जि. बीड) : येथून जवळच असलेल्या मुरंबी धरणात मासे पडण्यासाठी गेलेल्या दोघांना जलसमाधी मिळाली आहे. यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी ९ वाजता अंबाजोगाई तालक्यातील घाटनांदूर येथे घडली. धर्मा विठ्ठल गव्हाणे (वय ३९, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे जलसमाधी मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सोमवारी रात्री सुरू झालेला जोरदार पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत सुरू होता. या पावसाने मुरंबी धरणात मोठ्या पाण्याची आवक सुरू होती. धरण भरले असून सांडव्याद्वारे पाणी वाहत होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी मासे धरण्यासाठी धर्मा विठ्ठल गव्हाणे (वय ३९) व बाबासाहेब प्रभाकर आदमाने (वय ३०), अनिल विठ्ठल गव्हाणे (वय ३५) हे तिघे गेले. ९ वाजण्याच्या सुमारास पाण्याचा प्रवाह वाढला. सांडव्यावरुन पाणी वाहत असतानाही तिघे मासे धरण्याचे काम होते. याचवेळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्याच्या भिंतीवरुन धर्मा व बाबासाहेब हे धरणात पडले. यात धर्मा गव्हाणे बेपत्ता झाले. याचवेळी धर्माचा भाऊ अनिल जवळच मासे धरीत होता. त्याने दोघांना धरणात पडल्याचे पाहताच अनिल याने आरडाओरड केली. लोक जमा झाले. यानंतर दोघांचा शोध घेतला. दरम्यान, बाबासाहेब आदमाने हा झाडाच्या खोडाला धरुन बसलेला दिसला. त्याला ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढले. परंतु धर्मा गव्हाणे यांचा शोध लागला नाही. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. धर्मा गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई भाऊ असा परिवार आहे.

310821\narshingh suryvanshi_img-20210831-wa0028_14.jpg

धर्मा गव्हाणे

Web Title: Both were buried in Murambi dam at Ghatnandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.