वाळूच्या डंपरने दोघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:12 IST2018-06-19T16:09:58+5:302018-06-19T16:12:10+5:30
अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

वाळूच्या डंपरने दोघांना चिरडले
नाऊर(अहमदनगर) : अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
भागवत बबन त्रिभूवन (वय ३०) व शुभम भागवत त्रिभूवन (वय १०, दोघे रा. नाऊर, ता.श्रीरामपूर) हे नाऊर येथून हरेगावला जात असताना समोरून आलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात पिता-पूत्र गंभीर जखमी झाले. धडक देवून डंपर वेगाने पसार झाला. परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात आणले. यातील भागवत त्रिभूवन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र मोटारसायकलचा क्रमांकचा त्यात कुठेही उल्लेख नाही. फिर्यादी गणेश सोपान त्रिभूवन आणि जखमी यांचे नात्याबद्दलही ठाणे अंमलदार पवार यांना माहिती देता आली नाही. तपासी अधिकारी हे पुणे येथे गेले होते. त्यांना यासंदर्भात काहीही सांगता आले नाही.
याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक खान यांच्याशी संपर्क केला असता वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैैठक झाली आहे. मात्र आमचे भरारी पथक परिवहन आयुक्तांनी मुंबई येथे बोलविले आहे. पथक आल्यानंतर दोन दिवसानंतर कारवाई करू, असे उत्तर त्यांनी दिले.