कारच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 18:23 IST2017-07-19T18:23:12+5:302017-07-19T18:23:12+5:30
हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला़

कारच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर
आॅनलाइन लोकमत
नेवासाफाटा, दि़ १९ - नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडकाफाट्यानजिक हॉटेल औदुंबर जवळ स्विफ्ट कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला़ हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला़
नगरहून औरंगाबादकडे जाणारी स्विफ्ट कार (क्रमांक एम. एच. २०, डि. जे. ७४०२) खडकाफाट्यानजिक आली असताना नेवाशाकडे येत असलेल्या दुचाकी मोटारसायकलला (क्रमांक एम.एच.१७, ए.डब्यु ५३४७) या कारने जोरदार धडकेत दिली़ या भीषण अपघातात दुचाकीवरील मच्छिंद्रनाथ सोमनाथ आघाव (वय २४) व बबन भागाजी आघाव (वय ६०, दोघेही रा़ चिंचोली, ता़ राहूरी) हे जागीच ठार झाले तर विठ्ठल भिवा आघाव (वय ४०) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत़ जखमीची प्रकृती चिंताजनक असून, नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगरला हलविण्यात आले़ याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे सुरु आहे.