उसाच्या ट्रकने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:07 IST2019-02-24T13:06:45+5:302019-02-24T13:07:00+5:30
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डाक बंगल्याजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने दोघांना चिरडले

उसाच्या ट्रकने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू
राहुरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डाक बंगल्याजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने दोघांना चिरडले. बाबासाहेब बाजीराव ससे, रवींद्र तुकाराम दांगट (दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ससे व दांगट हे दोघे वांबोरी येथून दुचाकीवरून चालले होते. रात्रीच्या वेळी भरधाव वेगातील उसाच्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. त्याने दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.