दोन्ही सरकारने साखर, इथेनॉलबाबत धोरण ठरवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:48+5:302021-09-19T04:21:48+5:30
कोपरगाव : मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात होत असल्याने राज्यात व देशात उसासह साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. ...

दोन्ही सरकारने साखर, इथेनॉलबाबत धोरण ठरवावे
कोपरगाव : मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात होत असल्याने राज्यात व देशात उसासह साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. त्यात मागील हंगामातील ९० लाख टन साखर गोदामात अतिरिक्त असून, चालू हंगामात ३१५ लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने आगामी पाच वर्षांच्या साखर उद्योग स्थैर्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन साखरेसह इथेनॉल उत्पादनास कायमस्वरूपी दर ठरवून खुल्या अर्थव्यवस्थेत सहकार टिकविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मागील हंगामात कारखान्याने ऐतिहासिक गाळप केल्याबद्दल सर्व सभासद, आजी माजी संचालक, कारखाना व्यवस्थापनाचे मागील सभेचे इतिवृत्त सचिव तुळशीराम कानडे यांनी वाचले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात एकमुखाने मंजूर करण्यात आले. दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात रुग्णांना दिलासा देऊन त्यांच्यासाठी ५०० खाटांचे रुग्णालय उभारून मोफत उपचार केल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा ऐनवेळच्या विषयात भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर यांनी सत्कार केला.
कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे बळकटीकरण करण्यासाठी नव्याने अमित शहा यांची सहकार मंत्री म्हणून नियुक्ती करीत साखरेसह इथेनॉलबाबत त्याच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी धोरणात्मक निर्णय घेत डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारून आत्मनिर्भर भारत देशाचे स्वप्न साकारण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. शेवटी उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे, फकीर बोरनारे, भास्कर भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजी वक्ते, अरुण येवले, अशोक औताडे, सोपान पाणगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगीता राजेंद्र नरोडे, सोनूबाई भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, लेखापाल एस. एन. पवार, प्रवीण टेमगर उपस्थित होते.
..............
फोटो ओळी
कोपरगाव : कोल्हे कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली.
फोटो१८- कोल्हे कारखाना सभा -कोपरगाव
180921\img_20210917_161200.jpg
फोटो१८- कोल्हे कारखाना सभा -कोपरगाव