संगमनेरात बंगला फोडून चोरी : पिता-पुत्राला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:36 IST2018-07-21T18:36:22+5:302018-07-21T18:36:33+5:30

शहरातील नाशिक -पुणे महामार्गावरील कुंथुनाथ सोसायटीत चोरट्यांनी बंगला फोडून १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Bombs exploded in Sangamner | संगमनेरात बंगला फोडून चोरी : पिता-पुत्राला मारहाण

संगमनेरात बंगला फोडून चोरी : पिता-पुत्राला मारहाण

संगमनेर : शहरातील नाशिक -पुणे महामार्गावरील कुंथुनाथ सोसायटीत चोरट्यांनी बंगला फोडून १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या पिता-पुत्राला चौघा चोरट्यांनी बेदम मारहाण केली. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर भरतकुमार बाबूलाल मेहता यांनी दिलेल्या फिर्यादिवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा मारहाणीत भरतकुमार बाबूलाल मेहता व आतिषकुमार भरतकुमार मेहता हे पित्रा-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.
शहरानजीक नाशिक -पुणे महामार्गावर कुंथुनाथ सोसायटीत भरतकुमार मेहता हे आपल्या कुटूंबासमेवत राहतात. शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मेहता यांच्या बंगल्याच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांच्या आवाजाने मेहता कुटंूबीय जागे झाल्याने चोरट्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनास्थळी ठसे तज्ञांचा पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत हे करत आहेत़

 

Web Title: Bombs exploded in Sangamner