अकोले : तालुक्यातील खानापूर शिवारातील काटवनात शेळ्या चरण्यासाठी रानात गेलेल्या देवबाई पांडू गि-हे (वय २४) या महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.७) रात्री उशिरा आढळून आला आहे. या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत.या महिलेचा आकस्मात मृत्यू की खून? याचा तपास पोलीस करीत आहेत. रविवारी सकाळी ७ वाजता धोंडिबा पांडू गि-हे (वय २२) यांच्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत महिला शनिवारी शेळ्या चरण्यासाठी सकाळी ११ वाजता रानात गेली होती. सायंकाळी घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तपास केला असता रात्री उशिरा तिचा मृतदेह कटवनात आढळून आला.
महिलेचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:11 IST