गोदावरी नदीत महिलेचा मृतदेह
By Admin | Updated: October 7, 2016 00:49 IST2016-10-07T00:24:24+5:302016-10-07T00:49:18+5:30
नेवासाफाटा : प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.

गोदावरी नदीत महिलेचा मृतदेह
नेवासाफाटा : प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
महिलेची उंची पाच फूट तीन इंच, रंग गोरा, मजबूत बांधा, कानात झुंबके व वेल, डाव्या हाताच्या बोटात पांढऱ्या रंगाची अंगठी, मनगटावर गोंधलेले असून, डाव्या हातात दोन पिवळ्या बांगड्या, हाताच्या बोटाला लाल रंगाची नेलपेंट, दोन्ही पायांत चाळ, नाकात मुरणी, गळ्यात दोन पदरी काळ्या रंगाची पोत आहे.
महिलेविषयी माहिती असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार पवार यांनी केले आहे. पोलिस पाटील श्रीराम शिंदे यांनी याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
(वार्ताहर)