बेलपांढरी शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST2021-03-14T04:20:32+5:302021-03-14T04:20:32+5:30

नेवासा : तालुक्यातील बेलपांढरी शिवारात एका उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका अंदाजे वीस वर्षीय महिलेचा मृतदेह शनिवारी आढळला. याप्रकरणी ...

The body of an unidentified woman was found in Belpandhari Shivara | बेलपांढरी शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

बेलपांढरी शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

नेवासा : तालुक्यातील बेलपांढरी शिवारात एका उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका अंदाजे वीस वर्षीय महिलेचा मृतदेह शनिवारी आढळला. याप्रकरणी नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सुरेगाव फाटा-जैनपूर रस्त्यावरील बेलपांढरी शिवारात गारुळे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड चालू असताना शनिवारी सकाळी ऊसतोड कामगाराला एक कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला.

संबंधित शेती मालकाने याबाबत नेवासा पोलिसांना दिलेल्या खबरीवरून पोलीस निरीक्षक विजय करे व पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याने घटनास्थळीच मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. ही घटना पंधरा ते वीस दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The body of an unidentified woman was found in Belpandhari Shivara