फक्राबादच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:49+5:302021-02-07T04:19:49+5:30

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील शुक्रवारी (दि. ५) बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. संग्राम संतोष ...

The body of a missing boy from Fakrabad was found in a well | फक्राबादच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला विहिरीत

फक्राबादच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला विहिरीत

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील शुक्रवारी (दि. ५) बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

संग्राम संतोष भोसले असे त्या मुलाचे नाव आहे. मुलाचा तोल जाऊन तो विहिरीत पडला असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. संग्राम शुक्रवारी घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. याबाबत सोशल मीडियावरून मेसेज, फोटोही व्हायरल होत होता. पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सूत्रे हलवून या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी येथील ग्रामस्थ रज्जाक शेख यांना मुलाच्या घराजवळील कठडे नसलेल्या विहिरीतील पाण्यात मुलाच्या चपला तरंगताना आढळून आल्या. यामुळे संग्राम हा विहिरीत पडल्याचा अंदाज वाटल्याने दोन मोटारीच्या सहायाने पाणी उपसण्यात आले व ग्रामस्थांचा अंदाज खरा ठरला. नंतर दोरीच्या साहाय्याने त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

हा मृतदेह काढण्यासाठी फक्राबाद येथील सरपंच विश्वनाथ राऊत, पोलीस पाटील योगिनाथ जायभाय, तलाठी आर. जी. भुक्तारे, कोतवाल महेबूब शेख, पो. हे. फुलमाळी, ग्रामस्थ काकासाहेब जाधव, नितीन राऊत, शरद खताळ, अंगद पोकळे यांनी मदत केली.

Web Title: The body of a missing boy from Fakrabad was found in a well