शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरमधील शेतविहीरीमध्ये दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 21:20 IST

पोलिसांनी आसपासच्या गावात मुलांची ओळख पटण्यासाठी चौकशी केली असता ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैजापुर : तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.

या घटनेतील दोन्ही मुलांचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षांचे असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे हा अपघात कि खून याबाबत तर्कवितर्क होत असून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

पोलिसांनी आसपासच्या गावात मुलांची ओळख पटण्यासाठी चौकशी केली असता ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील गट क्रमांक २ मध्ये बापुसाहेब कल्याण पवार यांची शेतजमीन आहे. शेतवस्तीपासून दूर अंतरावर विहिर असून विहिरीत जवळपास दोन परस पाणी आहे. शनिवारी सायंकाळच्या वेळी बापुसाहेब पवार यांनी विहिरीत डोकावून बघितले असता दोन लहान मुले पाण्यावर तरंगतांना आढळून आली. पवार यांनी तातडीने पोलिसांनी कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय पोलिस अधिकारी गौतम पवार, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय एच.बी.बोराडे, पोलिस नाईक अक्रम पठान, माधव जरारे, एस.के.सरोदे, बिरूटे, बाबासाहेब धनुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यातील एकाच्या कपाळावर गंभीर जखम झाली आहे. दोघांना उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे सावखेडगंगा परिसरात खळबळ उडाली आहे.

नगरच्या शाळेतील विद्यार्थी असल्याचा संशयविहिरीत मृतावस्थेत आढळून आलेल्या मुलाच्या अंगात नगर शहरातील यशश्री प्ले ग्रुप व नर्सरी शाळेचा लोगो असल्याचा शर्ट आहे. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे यांनी सदरील शाळेचे प्राचार्यांशी फोनवरून संपर्क साधला असता प्राचार्यांनी सध्या शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्याची पालकांशी चर्चा करून बेपत्ता असलेल्या मुलांची माहिती पोलिसांना कळवू, असे सांगितले. नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या कार्य क्षेत्रात असल्याने अनोळखी मुलाचा शोध घेण्यासाठी नगर पोलिसाची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी