अल्पवयीन मुलीचा मृतदेह चार दिवसांनी सापडला
By Admin | Updated: December 22, 2015 23:11 IST2015-12-22T23:02:57+5:302015-12-22T23:11:15+5:30
कोपरगाव: फोटो काढून व्हॉटस्अॅपवर व्हायरल करून त्रास दिल्यानंतर अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह नांदूर-मध्यमेश्वर जलद कालव्यात चार दिवसानंतर आढळला़

अल्पवयीन मुलीचा मृतदेह चार दिवसांनी सापडला
कोपरगाव: फोटो काढून व्हॉटस्अॅपवर व्हायरल करून त्रास दिल्यानंतर अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह नांदूर-मध्यमेश्वर जलद कालव्यात चार दिवसानंतर आढळला़ या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे़
कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील ताराबाई भास्कर आहेर (वय १७) असे मयत मुलीचे नाव आहे़ तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला, असून चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ करंजी येथील ताराबाई भास्कर आहेर ही सतरा वर्षीय युवती कोपरगाव येथील महिला महाविद्यालयात ११ वी वाणिज्य शाखेत शिकत होती़ ती दि़ १८ डिसेंबर रोजी रात्री घरातून बेपत्ता झाली़ कुटुंबियांनी प्रथम शोध घेतला़ ती मिळून न आल्याने २० डिसेंबर रोजी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ मंगळवारी (दि़ २२) सकाळी तिचा मृतदेह तालुक्यातील गोधेगाव शिवारात नांदूर-मध्यमेश्वर जलद कालव्यात आढळून आला़ त्यानंतर मुलीचे वडील भास्कर केदू आहेर यांनी