बोधेगावला पोलीस ठाणे कार्यान्वीत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST2021-02-17T04:26:38+5:302021-02-17T04:26:38+5:30

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोधेगावाची हद्द ही बीड व औरंगाबाद जिल्ह्यालगत आहे. शेवगाव पासून तब्बल पाऊण तासाच्या ...

Bodhegaon should be made a police station | बोधेगावला पोलीस ठाणे कार्यान्वीत करावे

बोधेगावला पोलीस ठाणे कार्यान्वीत करावे

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोधेगावाची हद्द ही बीड व औरंगाबाद जिल्ह्यालगत आहे. शेवगाव पासून तब्बल पाऊण तासाच्या अंतरावर असलेले बोधेगाव व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, याबाबतचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेला आहे. बोधेगाव पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध आहे. या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांचा वावर वाढल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुढे येत आहे. त्यामुळे या भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने पोलीस ठाणे कार्यान्वीत करण्याची मागणी बोधेगाव ग्रामस्थांच्या वतीने काकडे यांनी केली आहे.

-------------------------------------------

फोटो -१६ हर्षदा काकडे

ओळी- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पोलीस ठाणे कार्यान्वीत करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

Web Title: Bodhegaon should be made a police station