देशव्यापी बंदमध्ये मंडळाधिकारीही झाले सहभागी
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:53+5:302020-12-09T04:16:53+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कार्यालय बंद ठेवून मंडळाधिकारीही सहभागी झाल्याचे उघड झाले असून, या ...

देशव्यापी बंदमध्ये मंडळाधिकारीही झाले सहभागी
अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कार्यालय बंद ठेवून मंडळाधिकारीही सहभागी झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप शहर मध्य मंडळाध्यक्ष अजय चितळे यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी बंदची हाक दिली होती. देश बंद असल्याने नगर शहरातील नालेगाव येथील मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची बाब भाजपचे अजय चितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. चितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजना, तसेच अन्य विशेष साहाय्य योजनांसाठी शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती केली आहे. हे दाखले मिळविण्यासाठी लाभार्थी नालेगाव मंडळाधिकारी कार्यालयात गर्दी करतात. मात्र, नालेगावचे मंडळाधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. यावर कळस असा की, भारत बंदच्या नावाखाली मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले असून, यामुळे १०० ते १५० लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागल्याचे चितळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
....
सूचना फोटो ०८ नालेगाव नावाने आहे.
फोटो ओळी
भारत बंदच्या नावाखाली नालेगाव मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवल्याच्या निषेधार्थ निदर्शने करताना भाजप शहर मध्य मंडळाध्यक्ष अजय चितळे व विशेष साहाय्य योजनांचे लाभार्थी.