तरूणाचा निर्घृण खून

By Admin | Updated: May 28, 2014 00:14 IST2014-05-28T00:00:45+5:302014-05-28T00:14:33+5:30

कर्जत : न्यायालयात सुरु असलेला खटला मागे घेत नसल्याचा राग येऊन तालुक्यातील आखोणीजवळील वडारवाडी येथे अब्बाशा दागिन्या काळे (वय ४८) या तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला.

Bloodless bloodshed | तरूणाचा निर्घृण खून

तरूणाचा निर्घृण खून

कर्जत : न्यायालयात सुरु असलेला खटला मागे घेत नसल्याचा राग येऊन तालुक्यातील आखोणीजवळील वडारवाडी येथे अब्बाशा दागिन्या काळे (वय ४८) या तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीत पाच महिला जखमी झाल्या. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत संजना अब्बाशा काळे यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, मयत अब्बाशा काळे घराबाहेर झोपलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास बंड्या काळे, बाक्या काळे, मिथून काळे, गोच्या काळे, सालिम्या काळे (सर्व रा. आखोणी), विष्णू काळे (रा. करपडी), शोभीचंद्र काळे (रा. काष्टी), मुक्या भोसले व त्यांची चार मुले हे सर्वजण गज, कोयते घेऊन आले. ‘आमच्याविरुध्दची न्यायालयातील केस काढून का घेत नाही, याविषयी या सर्वांनी अब्बाशा काळे याच्याकडे विचारणा करुन काळे याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी यावेळी संजना काळे, ललिता भोसले, मनिता काळे, कावेरी काळे, गुलछडी काळे यांना मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या. कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय चितळे करीत आहेत. घटनेतील सर्व आरोपी अजून फरार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bloodless bloodshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.