श्रीगोंद्यात अनोळखी महिलेचा खून
By Admin | Updated: June 30, 2016 01:21 IST2016-06-30T01:15:21+5:302016-06-30T01:21:58+5:30
श्रीगोंदा: येथील रेल्वे स्टेशननजीक एका विवाहित अनोळखी महिलेवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचे प्रेत रेल्वे रुळानजीक टाकण्यात आले

श्रीगोंद्यात अनोळखी महिलेचा खून
श्रीगोंदा: येथील रेल्वे स्टेशननजीक एका विवाहित अनोळखी महिलेवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचे प्रेत रेल्वे रुळानजीक टाकण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या महिलेचे वय अंदाजे ३० आहे. या घटनेची खबर श्रीगोंदा रेल्वे स्टेशन मास्तर लिला पंडित यांनी दिली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तिच्या मानेवर व्रण आहेत.
श्रीगोंदा पोलिसांनी महिलेचा मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नेला होता. मात्र या प्रकरणात गुंतागुंत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला व ससून रुग्णालयात मृतदेह पाठविण्याची शिफारस केली ंआहे.
(तालुका प्रतिनिधी)