सोडचिठ्ठीवरून खून

By Admin | Updated: May 27, 2014 00:31 IST2014-05-27T00:23:46+5:302014-05-27T00:31:34+5:30

संगमनेर : मावस बहिणीस सोडचिठ्ठी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील देवकौठे येथील सुरेश रामनाथ मुंगसे या ३५ वर्षीय युवकाला काठ्यांनी बेदम मारहाण करीत त्याचा खून करण्यात

Blood from soda | सोडचिठ्ठीवरून खून

सोडचिठ्ठीवरून खून

संगमनेर : मावस बहिणीस सोडचिठ्ठी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील देवकौठे येथील सुरेश रामनाथ मुंगसे या ३५ वर्षीय युवकाला काठ्यांनी बेदम मारहाण करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात एका आरोपीस अटक केली असून, दोघे फरार आहेत. संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी पहाटेच्या सुमारास देवकौठे येथील आरोपी हरिष अशोक मुंगसे, अनिल अशोक मुंगसे व एक अनोळखी इसम यांनी सुरेश मुंगसे यांच्या घरी जाऊन त्यांना काठ्यांनी मारहाण केली. आरोपींच्या मावस बहिणीला तीन महिन्यांपूर्वी सोडचिठ्ठी दिल्याच्या कारणावरून व त्याचा राग धरून सुरेश मुंगसे यास जबर मारहाण करत त्यांना जीवे ठार केले. याबाबत मृत सुरेश मुंगसे याचे वडील रामनाथ यादव मुंगसे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना घडतेवेळी आसपासचे नागरिक बाहेर जमा झाले होते. अनेकांनी सोडवा, सोडवा म्हणून आरडाओरड केली. मात्र यातील एका आरोपीकडे बंदूक होती. त्याने नागरिकांना दम भरल्यामुळे कोणीही पुढे गेले नाही अशी चर्चा नागरिक करीत होते. सुरेश मुंगसे याला जबरी मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले. कालांतराने मृत मुंगसे याचे भाऊ सिन्नर येथून आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी मुंगसे यास तळेगाव दिघे येथील खासगी दवाखान्यात व पुढे संगमनेरला डॉ. तांबे हॉस्पिटलमध्ये आणले. तत्पूर्वी सुरेश याचे निधन झाले होते. सुरेश याच्या मृतदेहावर कॉटेज रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी देवकौठे येथे मृत मुंगसे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर व तालुका पोलीस निरीक्षक सुरेश भामरे यांनी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी फरार आहेत. यातील आरोपी अज्ञात अनोळखी इसम हा इगतपुरी तालुक्यातील असल्याचे पोलीस निरीक्षक भामरे यांनी सांगितले. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना केल्याचे पोलीस निरीक्षक भामरे यांनी सांगितले.

Web Title: Blood from soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.