माळीवाड्यातील तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:33+5:302021-01-04T04:18:33+5:30

अहमदनगर : माळीवाडा येथील तरुणांनी एकत्र येत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान ...

Blood donation was made by the youth of Maliwada | माळीवाड्यातील तरुणांनी केले रक्तदान

माळीवाड्यातील तरुणांनी केले रक्तदान

अहमदनगर : माळीवाडा येथील तरुणांनी एकत्र येत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.

महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने माळीवाडा येथे रविवारी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी माळीवाडा येथील युवा उद्योजक कमलेश जंजाळे, भरत जाधव, ओंकार लेंडकर, अक्षय गाडळकर यांनी पुढाकार घेतला होता. या चौघांनीही सोशल मीडियावरून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक तरुणांसह विविध भागातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी नागरिकांची दंत तपासणीही करण्यात आली. या शिबिराला डॉ. सुदर्शन गोरे,श्रीकांत आंबेकर,विकी कानडे, ओंकार फुलसौंदर, गणपत चेडे, मंदार लोखंडे, अक्षय चेडे आदी उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास मंगल भुजबळ, स्वाती सुडके, विष्णुपंत म्हस्के, अनिल इवळे, चंद्रकांत ताठे, बजरंग भुतारे, रोहित व्यवहारे, मोहित गांधी, शुभम भापकर, सिंद्धांत जाधव, अजिंक्य म्याना,अशोक तुपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गाडळकर यांनी केले तर आभार विकी कानडे यांनी मानले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करुन प्रोत्साहन दिले. अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले, तर डॉ. सुदर्शन गोरे यांनी रुग्णांची दंत तपासणी केली.

यावेळी युवा उद्योजक कमलेश जंजाळे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. तो भरून काढण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवक आणि ज्येष्ठांनी सहकार्य केल्यामुळ‌े शिबिर यशस्वी ठरले.

--------------

महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिक, पोलीस, तरुणांनी रक्तदान केले. यावेळी कमलेश जंजाळे, भरत जाधव, ओंकार लेंडकर यांच्यासह तरुण उपस्थित होते.

फोट- ०३ माळीवाडा

Web Title: Blood donation was made by the youth of Maliwada