प्रत्येक व्यक्तीने केलेले रक्तदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:11+5:302021-07-20T04:16:11+5:30

अहमदनगर : सध्या संपूर्ण राज्याला रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने केलेले रक्तदान ...

The blood donation made by each person is important | प्रत्येक व्यक्तीने केलेले रक्तदान महत्त्वाचे

प्रत्येक व्यक्तीने केलेले रक्तदान महत्त्वाचे

अहमदनगर : सध्या संपूर्ण राज्याला रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने केलेले रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून जिल्ह्यात महारक्तदान अभियान सुरू आहे. या अंतर्गत रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे सोमवारी मार्केटयार्ड येथील हमाल पंचायत भवन येथे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात रिक्षाचालक-मालकांनी प्रतिसाद दिला. मार्केटयार्ड येथील अर्पण ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आले. रक्तदात्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, प्रमुख सल्लागार विलास कराळे, लतीफ शेख, गणेश आटोळे, नसीर खान, कयूम सय्यद, राजू काळे आदी उपस्थित होते. गणेश ढोणे, दत्तात्रय वामन, अन्वर शेख, सागर लांडे, ओंकार पठारे, बाळू निवंत, अशोक राहिंज, प्रदीप मडके यांनी रक्तदान तेले. रक्तसंकलन करण्यासाठी अर्पण ब्लड बँकेच्या भाग्यश्री पवार, गणेश मोकाशे, सुषमा वैद्य, बाळू पतंगे, श्रीकांत कल्याणकर आदींनी सहकार्य केले.

-----------

फोटो -१९रिक्षाचालक

लोकमत महारक्तदान अभियानात सोमवारी रिक्षा चालक-मालक संघटनेने रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना आमदार संग्राम जगताप. समवेत सभापती अविनाश घुले, विलास कराळे, दत्ता वामन व संघटनेचे पदाधिकारी.

---------

लोगो- रक्तदान

Web Title: The blood donation made by each person is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.