हिंगणगावने येथे दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST2021-01-04T04:19:32+5:302021-01-04T04:19:32+5:30

भातकुडगाव : शेवगाव तालुक्यातील हिंगणगावने येथे रुक्मिणीबाई पवार यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पवार कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या शिबिरात ३० जणांनी रक्तदान ...

Blood donation camp on the occasion of Dashakriya ritual at Hingangaon | हिंगणगावने येथे दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर

हिंगणगावने येथे दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर

भातकुडगाव : शेवगाव तालुक्यातील हिंगणगावने येथे रुक्मिणीबाई पवार यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पवार कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले.

प्रहार संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांनी दशक्रिया कार्यक्रमात सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर घेतले. इतरांनीही असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हिंगणगावने येथील पवार कुटुंबातील रुक्मिणीबाई पवार यांच्या दशक्रियानिमित्त रक्तदान शिबीर घेतले. यावेळी ३० जणांनी रक्तदान केले. पवार कुटुंबातील अंकुश पवार यांंच्यासह सहा जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, बाळकृष्ण महाराज शिंदे, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, अशोक मेरड, राजेंद्र आढाव, अशोक देवढे, संदीप बामदळे, सतीश पवार, संजय पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp on the occasion of Dashakriya ritual at Hingangaon