या शिबिराचे उद्घाटन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, नागवडेचे संचालक अरुणराव पाचपुते, अनिलराव पाचपुते, ॲड विठ्ठलराव काकडे, वैभव पाचपुते, माणिकराव पाचपुते, आशाताई खोसे, सुवर्णा पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, ज्ञानदेव पाचपुते, चांगदेव पाचपुते, लालासाहेब फाळके, दिलीप दरेकर, दत्तात्रय गावडे, मिठूशेठ बोगावत, प्रा. सुनील माने आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात काष्टी ग्रामपंचायत, जयभवानी तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, दत्त तरुण मंडळ, आसरा तरुण मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, मैत्रीण ग्रुप, शिव छत्रपती तरुण मंडळ, साईसेवा प्रतिष्ठान, शिवशक्ती तरुण मंडळ, सावतामाळी प्रतिष्ठान, अहिल्यादेवी तरुण मंडळ, जैन श्रावक संघ, वाघजाई तरुण मंडळ, जयहिंद फाउंडेशन, शिव गर्जना तरुण मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, मेडिकल व डाॅक्टर असोसिएशन अशा विविध संघटना शिबिरात सक्रिय सहभागी होणार आहेत.
..............
स्व. शिवरामअण्णा पाचपुते व स्व. सदाअण्णा पाचपुते यांचे काष्टी गावाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या
स्मृतिप्रीत्यर्थ काष्टीत शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले, ही चांगली बाब आहे. यामध्ये सर्वांनी रक्तदान करावे.
-वैभव पाचपुते, माजी उपसरपंच, बाजार समिती श्रीगोंदा