जामखेड येथे बुधवारी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:14+5:302021-07-07T04:27:14+5:30
जामखेड : लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत जवाहरलाल दर्डा ऊर्फ बापूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड येथे ...

जामखेड येथे बुधवारी रक्तदान शिबिर
जामखेड : लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत जवाहरलाल दर्डा ऊर्फ बापूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड येथे बुधवारी (दि. ७) ल. ना. होशिंग विद्यालयात सकाळी ९ ते ४ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेता लोकमतने रक्ताचं नातं हे महाभियान सुरू केले. या अभियानामध्ये जामखेड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक काँग्रेस, शिवसेना, भाजप युवा मोर्चा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नगर परिषद कर्मचारी संघटना, केमिस्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, गुगळे उद्योग समूह, विकीभाऊ सदाफुले मित्रमंडळ, सदिच्छा मंडळ, गुरूमाउली मंडळ, भक्ती शक्ती महोत्सव, वंचित बहुजन आघाडी व ग्रामीण विकास केंद्र, मोहा ग्रामपंचायत, प्राचार्य विकी घायतडक मित्रमंडळ, मोहन पवार मित्रमंडळ, पशुवैद्यकीय संघटना, गुरुकुल मंडळ तसेच विविध संघटना सहभागी होणार आहेत.