महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेडला रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:32+5:302021-04-30T04:26:32+5:30
जामखेड : सध्याची रक्ताची गरज लक्षात घेऊन जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शनिवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाचे औचित्य ...

महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेडला रक्तदान शिबिर
जामखेड : सध्याची रक्ताची गरज लक्षात घेऊन जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शनिवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय कोरोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच नगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलीस दलानेही आता पुढाकार घेतला आहे.