पाथर्डीत शिवजयंतीनिमित्त तीनशे युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:54+5:302021-02-21T04:39:54+5:30

पाथर्डी : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासकीय नियमांचे पालन करत ...

Blood donation of 300 youths on the occasion of Shiva Jayanti in Pathardi | पाथर्डीत शिवजयंतीनिमित्त तीनशे युवकांचे रक्तदान

पाथर्डीत शिवजयंतीनिमित्त तीनशे युवकांचे रक्तदान

पाथर्डी : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासकीय नियमांचे पालन करत कार्यक्रम पार पडले.

शिवजयंती उत्सव समितीने शहरातील नाईक चौकात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात तीनशे जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना उत्सव समितीकडून वृक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तिका भेट देण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेटी दिल्या.

कसबा तरुण मंडळाच्या वतीने कसबा येथील पुतळ्यास आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी उपाध्यक्ष बंडू बोरुडे, अजय भंडारी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमूर्तीचे पूजन करून जयंती साजरी केली. शहरातील नवीन बसस्थानकासमोर शिवछत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहनचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, शहर सचिव संदीप काकडे, प्रथमेश नाकील, शिवव्याख्याते सचिन नागापुरे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी झाली. पोलीस निरीक्षक रणजित डेरे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेविका दीपाली बंग, रामनाथ बंग, संजू कोटकर, दिलीप रोडी, ज्ञानेश्वर कोकाटे, किरण काजळे, अभय मुळे, सचिन इधाटे, गोरक्ष रोडी, कानिफ आठरे, एजाज शेख मुन्ना शेख, अभिजित गुजरे, किशोर परदेशी, शाहनवाज शेख, सलीम शेख, मनोज गांधी, सुरेश कुलथे, शंकर पंडित आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तिलोक जैन विद्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य अशोक दौंड यांनी मनोगत व्यक्त केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच शिक्षकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाईन हा कार्यक्रम पार पडला.

------

२० पाथर्डी

पाथर्डी येथील शिबिरात रक्तदान करताना युवक. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे व इतर.

Web Title: Blood donation of 300 youths on the occasion of Shiva Jayanti in Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.