जामखेड येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात २५१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:51+5:302020-12-13T04:35:51+5:30
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे रक्तदान शिबिर, व्हर्च्युअल रॅली, ...

जामखेड येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात २५१ जणांचे रक्तदान
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे रक्तदान शिबिर, व्हर्च्युअल रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, मास्क व सॅनिटायझर वाटप आदी कार्यक्रम दिवसभर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात २५१ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून तालुक्यात विक्रम केला आहे.
सर्व रक्तदात्यांना आयोजकांकडून मोफत हेल्मेट, पाण्याचा जार वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात महिला, मुलींनीही रक्तदान केले. आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाग अकरामध्ये प्रशांत राळेभात व प्रभाग आठमध्ये सय्यद इस्माइल या कार्यकर्त्यांनी मास्क व सॅनिटायझर वाटप केले. खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह गोलेकर यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, शिवसेना प्रमुख संजय काशीद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवनराजे राळेभात, अमित जाधव, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, ॲड. हर्षल डोके आदी उपस्थित होते.
( फोटो १२ जामखेड एनसीपी)
जामखेड येथे शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.