जामखेड येथे २१२ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST2020-12-14T04:34:38+5:302020-12-14T04:34:38+5:30

जामखेड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल ...

Blood donation of 212 people at Jamkhed | जामखेड येथे २१२ जणांचे रक्तदान

जामखेड येथे २१२ जणांचे रक्तदान

जामखेड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजित रक्तदान शिबिरात २१२ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, भगिनाथ उगले, बळीराम पवार, विक्रांत अब्दुले यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, राष्ट्रवादीचे राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती सूर्यकांत मोरे, निखिल घायतडक, सामजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अमोल भगत, राम जहागीरदार, सेवा दलाचे राजू पाचारे, फिरोज पठाण, कुंडल राळेभात, पवन राळेभात, प्रा. लक्ष्मण ढेपे, अशोक निमोणकर, रोहित खरात, चेतन फुंदे, प्रीतम ढगे, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 212 people at Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.