बेलापुरात ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:01+5:302021-08-14T04:26:01+5:30
जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा, प्रकाश चित्ते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ...

बेलापुरात ग्रामस्थांचा रास्ता रोको
जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा, प्रकाश चित्ते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, पुष्पलता हरदास, राजेंद्र चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे यावेळी उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, उपअधीक्षक मिटके यांना निवेदन देण्यात आले. फरार आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस यंत्रणेने आव्हान म्हणून गुन्ह्याचा तपास स्वीकारला आहे. आंदोलन न करता पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास देण्यात येईल असे लेखी आश्वासन मिटके यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
--------
फोटो ओळी : बेलापूर आंदोलन
बेलापूर येथे अपहृत मुलीच्या सुटकेच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
-------