ढोरजळगावला महावितरण विरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:13+5:302021-02-21T04:40:13+5:30
शेवगाव : तालुक्यातील ढोरजळगाव येथे शनिवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्युत महावितरण कंपनीने वडुले खुर्द, आव्हाने, ढोरजळगाव, निंबेनांदूर, ...

ढोरजळगावला महावितरण विरोधात रास्ता रोको
शेवगाव : तालुक्यातील ढोरजळगाव येथे शनिवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्युत महावितरण कंपनीने वडुले खुर्द, आव्हाने, ढोरजळगाव, निंबेनांदूर, वाघोली, गरडवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ राज्य महासचिव किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात अजिनाथ आव्हाड, महादेव पाटेकर, सरपंच बाळासाहेब आव्हाड, संदीप आव्हाड, अमोल आव्हाड, सोमनाथ बडे, अशोक शिंदे ,सोमनाथ शिरासाठ, मल्हारी आव्हाड, हसन शेख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज वितरणचे उपअभियंता अतुल लोहरे, ढोरजळगावचे उपअभियंता पाटील यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच बंद केलेले रोहित्र तत्काळ सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस कर्मचारी बाळासाहेब नागरगोजे, संदीप ढाकणे, वैजनाथ चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.