हॉटेल मालकासह कुटुंबाला बिलावरुन बेदम मारहाण
By Admin | Updated: August 12, 2014 23:20 IST2014-08-12T23:12:29+5:302014-08-12T23:20:01+5:30
जामखेड : हॉटेलचे बिल मागितल्याचा राग येऊन हॉटेलमालकासह कुटुंबियाला बेदम मारहाण केल्याची घटना जामखेडनजीक सोमवारी रात्री घडली.

हॉटेल मालकासह कुटुंबाला बिलावरुन बेदम मारहाण
जामखेड : हॉटेलचे बिल मागितल्याचा राग येऊन हॉटेलमालकासह कुटुंबियाला बेदम मारहाण केल्याची घटना जामखेडनजीक सोमवारी रात्री घडली. यामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले असून २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाजणास अटक करण्यात आली. घटनेत तलवार, गज, काठ्यांचा वापर करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, फिर्यादी बाबासाहेब नामदेव पोटरे यांनी जामखेड-नगर मार्गावर नव्याने हॉटेल सुरु केले आहे. हॉटेल पाहण्यासाठी पोटरे कुटुंब आले होते. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ग्राहक हॉटेलमधून जेवण करुन बाहेर पडत असताना हॉटेल व्यवस्थापकाने शांताराम नवनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बिलाची मागणी केली.
या बिलाच्या मागणीचा राग येऊन शांताराम शिंदे यांच्यासमवेत असलेले बाबाजी दिनकर काटकर, बालाजी जगन्नाथ काटकर, दादा संभाजी काटकर, गोविंद नवनाथ शिंदे, संभाजी काटकर, अमोल कल्याण काटकर, राजेंद्र दिनकर काटकर, अमोल विष्णू गिते, राम सुरेश काटकर, सनी श्रीधर (हॉटेल वेटर), भाऊसाहेब बबन काटकर, वैभव शिवाजी काटकर, अमीर शब्बीर शेख, सचिन विष्णू गिते, अशोक विष्णू गिते, बबलू सुनील पोकळे, बंटी पवार, सोमा बाळू अनारसे, दत्ता प्रकाश काटकर,शहाजी रघुनाथ काटकर, गणेश भगवान काटकर, वसंत महादेव काटकर, मोहन महादेव काटकर,चंद्रकांत भानुदास काटकर, बापू मच्छिंद्र काटकर, सुनील मारुती पोकळे व इतर चार ते पाच जणांनी राजू बाबासाहेब पोटरे, गणेश बाबासाहेब पोटरे, कानिफनाथ बाबासाहेब पोटरे, गणेश आश्रू पोटरे यांना तलवार, काठी, गजाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी बाबासाहेब पोटरे यांना काठीने मारहाण केली. पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
(तालुका प्रतिनिधी)
जखमींना नगरला हलविले
मारहाणीत जखमी झालेल्या या सर्वांवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना नगरला हलविण्यात आले. याप्रकरणी शांताराम नवनाथ शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.