शिंदेंनी घेतले आई -वडिलांचे आशीर्वाद

By Admin | Updated: July 11, 2016 23:49 IST2016-07-11T23:38:31+5:302016-07-11T23:49:54+5:30

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी अचानक चौंडी (ता. कर्जत) या आपल्या गावी येऊन आई-वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

The blessings of Shindane's parents and parents | शिंदेंनी घेतले आई -वडिलांचे आशीर्वाद

शिंदेंनी घेतले आई -वडिलांचे आशीर्वाद

कर्जत : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही आलेले जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी अचानक चौंडी (ता. कर्जत) या आपल्या गावी येऊन आई-वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
चौंडी येथे आपल्या घरी जाऊन त्यांनी आई- वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जतमध्ये विकास कामांची आढावा बैठक घेतली. कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर येथे आल्यानंतर त्यांनी प्रथम कर्जतकरांना अभिवादन केले. पदयात्रेने जाऊन गोदड महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा कर्जत शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलांगे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, भाजयुमोचे शहराध्यक्ष सागर साळुंके, अतुल कानडे आदी हजर होते.
कर्जत विश्रामगृहातील बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेतला. कर्जत तालुक्यात कोणकोणत्या ठिकाणी बंधारे करता येतील, याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, तहसीलदार किरण सावंत, पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी हजर होते.
कर्जत येथील न्यायालयाच्या इमारतीला निधी मंजूर करून काम सुरू केले, तसेच कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल कर्जत तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष नवनाथ फौंडे, अ‍ॅड. उत्तम नेवसे, अ‍ॅड. दीपक भंडारी यांनी शिंदे यांचा सत्कार केला.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The blessings of Shindane's parents and parents