उपेक्षितांचे आशीर्वाद हीच मौलिक संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:56+5:302020-12-12T04:36:56+5:30
कर्जत : उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. कर्जत येथील महिलांनी एकत्र येऊन लघु उद्योग सुरू केला आहे. ...

उपेक्षितांचे आशीर्वाद हीच मौलिक संपत्ती
कर्जत : उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. कर्जत येथील महिलांनी एकत्र येऊन लघु उद्योग सुरू केला आहे. या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांस प्रवरा परिवार खंबीरपणे पाठबळ देईल, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.
कर्जत येथे लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून ‘आपले गाव, आपला रोजगार’ या योजनेचा शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. भामबाई राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैमुले, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा, युवा मोर्चाचे विनोद दळवी, अमृत काळदाते, अनिल गदादे, नगसेविका उषा राऊत, राखी शहा, नीता कचरे, हर्षदा काळदाते, डॉ. कांचन खेत्रे, आशा वाघ, सुनिता हिरडे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सबलीकरणासाठी घोषणाबाजी करणे सोपे असते. मात्र कृती करणे अवघड आहे. त्यासाठी आवश्यक ते भांडवल, मनुष्यबळ आणि इच्छाशक्ती लागते. ती नामदेव राऊत यांच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे कृतीत उतरत आहे.
यावेळी प्रशिक्षिका सुनिता हिरडे, तब्बसुम शेख यांची भाषणे झाली. प्रास्ताविक उषा राऊत यांनी केले. तर नगरसेविका राखी शहा यांनी आभार मानले.
११ कर्जत विखे
कर्जत येथे ‘आपले गाव आपला रोजगार’ योजनेचा प्रारंभ करताना खा. डॉ. सुजय विखे व इतर.