निकृष्ट काम करणाऱ्या ठेकदारांना काळ्या यादीत टाका
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:04+5:302020-12-05T04:38:04+5:30
पोळ म्हणाले, मागील वर्षी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहरातील नित्कृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली ...

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकदारांना काळ्या यादीत टाका
पोळ म्हणाले, मागील वर्षी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहरातील नित्कृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती, तसेच मागील काही महिन्यांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी देखील तालुक्यातील विविध विकास कामे नित्कृष्ट करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली. मात्र, अनेक दिवस उलटून गेले तरी त्यांना ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे या घोषणा फक्त ठेकेदारांना भीती दाखवण्यापुरत्या होत्या का किंवा या घोषणेनंतर खरोखरच कामाचा दर्जा सुधारला आहे का, याबाबत शंका निर्माण झाली असून, ठेकेदारांसोबत संगनमत करून सर्व काही आलबेल सुरू आहे.