काळे-कोल्हेंबरोबर औताडेही आखाड्यात

By Admin | Updated: June 16, 2014 00:10 IST2014-06-15T23:42:48+5:302014-06-16T00:10:53+5:30

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पक्षकेंद्रीत नसून ते व्यक्तीकेंद्रीत असल्याचे आजवरचे गणित़ काळे आणि कोल्हे यांनी तिसरी शक्ती उदयास येऊच दिली नाही़

With black-colonel in aadadei akhada | काळे-कोल्हेंबरोबर औताडेही आखाड्यात

काळे-कोल्हेंबरोबर औताडेही आखाड्यात

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पक्षकेंद्रीत नसून ते व्यक्तीकेंद्रीत असल्याचे आजवरचे गणित़ काळे आणि कोल्हे यांनी तिसरी शक्ती उदयास येऊच दिली नाही़ परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून नितीन औताडे यांचा पर्याय मतदारांसमोर असल्याने ही लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर ३५ वर्षे अधिराज्य केले़ २००४ च्या निवडणुकीत बिपीन कोल्हे यांना रिंगणात उतरविण्यात आले़ यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते स्व़ शंकरराव काळे यांचे पुत्र अशोक काळे शिवसेनेची उमेदवारी घेऊन उभे होते़ तत्पूर्वी काळे घराण्याकडून शंकरराव काळे, संभाजीराव काळे यांनी या मतदारसंघात नशिब आजमाविले होते़ परंतु कुणालाही यश आले नाही़ अशोक काळे यांच्या रूपाने कोपरगावातून आमदार होण्याची संधी काळे घराण्याला लाभली़ २००९ च्या निवडणुकीतही बिपीन कोल्हे विरूद्ध अशोक काळे असाच सामना रंगला, त्यातही अशोकरावांनी बाजी मारली़
काळे आणि कोल्हे या दोन राजकीय धुरिणांनी कोपरगावमध्ये तिसरी शक्ती उदयास येऊ दिली नाही़ सहकारी साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांच्या जोरावर तिसऱ्या शक्तीचा उदय होण्याआधीच खच्चीकरण केले जात असे. त्यामुळे लढत काळे आणि कोल्हे यांच्यातच होते़
मागील निवडणुकीत बाबासाहेब डमाळे, बाळासाहेब जाधव यांनी अनुक्रमे रिडालोस व मनसेकडून उमेदवारी घेऊन लढत देण्याचा प्रयत्न केला़ मात्र तो अतिशय तोकडा पडला़ साधारण अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी कोल्हे गटातून नितीन औताडे बाहेर पडले़ परंतु त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही़ काळे-कोल्हे या प्रस्तापितांविरूद्ध आपली लढाई असल्याचे सांगून औताडे यांनी कोपरगाव तालुका स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली़ महिन्याभरातच या आघाडीने जिल्हा परिषदेचा पोहेगाव गट आणि पंचायत समितीचे पोहेगाव आणि चांदेकसारे हे गण ताब्यात घेऊन तालुक्याचे लक्ष वेधून घेतले़ औताडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाठबळ असल्याचेही बोलले जाते़
महत्वाकांक्षी असलेल्या औताडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला आहे़ त्यांच्या उमेदवारीमुळे काळे, कोल्हेंचे नुकसान होते की कोणा एकाच्या ते पथ्यावर पडतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे़
शिवसेनाअशोक काळे  ८४६८०
राष्ट्रवादीबिपीन कोल्हे  ७७९८९
रिपाइं (आ.) बाबासाहेब ढमाले  ४४३१
इच्छुकांचे नावपक्ष
अशोक काळे शिवसेना
बिपीन कोल्हे  राष्ट्रवादी
नितीन औताडे  स्वाभिमानी विकास आघाडी

लोकसभा निवडणुकीत
सदाशिव लोखंडे यांना ५५ हजारांचे मताधिक्य

Web Title: With black-colonel in aadadei akhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.