अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:51 IST2017-08-22T17:48:56+5:302017-08-22T17:51:05+5:30
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे.

अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा
अहमदनगर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. आज दुपारी गांधी मैदानातील भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनीआगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरा-भाईंदरमध्ये भाजपाने मिळविलेल्या यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकत आहे. भाजपा संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.
उपमहापौर छिंदम म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेचा आमदार नगरमध्ये होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप यापासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आहे. यासाठी २०१८ ला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार असून त्यासाठी नियोजन करत आहोत.
सुवेंद्र गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे भाजपाच्या मागे उभी आहे. नगरमध्येही शहर भारतीय जनता पार्टी चांगले काम करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले. यावेळी विश्वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे उपस्थित होते