भाजपला सत्तेचा गर्व - महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 16:11 IST2017-02-08T16:11:12+5:302017-02-08T16:11:12+5:30

राज्यातील सत्ता बदलात आमच्या मित्रपक्षाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु भाजपला याचा विसर पडला आहे. त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे, अशी टीका महादेव जानकरांनी केली.

BJP's pride of power - Mahadev Jankar | भाजपला सत्तेचा गर्व - महादेव जानकर

भाजपला सत्तेचा गर्व - महादेव जानकर

आमची औकात काढू नका; सरकारला इशारा

ऑनलाइन लोकमत
जामखेड (अहमदनगर), दि.८ -  राज्यातील सत्ता बदलात आमच्या मित्रपक्षाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु भाजपला याचा विसर पडला आहे. त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात़ तुम्ही आमची औकात काढू नका़ तुमची जिरवण्यासाठी आम्ही सत्तेची झूल फेकून देऊ, अशी घणघाती टीका राज्याचे दुग्धविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
खर्डा (ता.जामखेड) येथील बसस्थानक आवारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ महादेव जानकर यांनी वाढवला़ त्यानंतर आयोजित प्रचारसभेत जानकर म्हणाले, आमचे दैवत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहे. ते नाहीत म्हणून आमची परवड करू नका. मी २३ वर्षांपासून संघर्ष करतो. चळवळीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी ब्रम्हचारी आहे. मला कशाची हाव नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी नको म्हणून आम्ही तुम्हाला जवळ केले. माझा पक्ष राज्यातच नव्हे तर देशात आहे. आमचा मान ठेवा, असे जानकर म्हणाले. यावेळी रासप तालुकाध्यक्ष विकास मासाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष सुनिल लोंढे, युवक तालुकाध्यक्ष रासप गणेश सुळ, शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष अमजद पठाण, वाकी गावचे सरपंच सोमनाथ पौडमोल, बाबा चंदन, केरबा जाधव, राहुल सुळ, रघुनाथ गोलेकर, वाकी सेवा संस्थेचे अध्यक्ष जयवंत सावंत, उपाध्यक्ष सोमनाथ श्रीरामे,बाबा कबीर, गंगा श्रीरामे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's pride of power - Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.