प्रचारासाठी भाजपाचा ‘मेगा इलेक्शन प्लॅन’

By Admin | Updated: October 2, 2014 00:33 IST2014-10-01T23:59:02+5:302014-10-02T00:33:34+5:30

शिर्डी : भाजपाने चारशे प्रचारक महाराष्ट्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे़

BJP's 'Mega Election Plan' for campaigning | प्रचारासाठी भाजपाचा ‘मेगा इलेक्शन प्लॅन’

प्रचारासाठी भाजपाचा ‘मेगा इलेक्शन प्लॅन’

शिर्डी : अन्य राज्यांतील लोकसभेनंतरच्या पोट निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता भाजपाने केंद्रीय मंत्रिमंडळ, तसेच अन्य राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासह तब्बल चारशे प्रचारक महाराष्ट्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे़पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी बुधवारी शिर्डीत जिल्ह्याची बैठक घेऊन झीरो ग्राऊंड रिपोर्ट घेतला़
विजयादशमीचे सीमोल्लंघन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ आॅक्टोबरला कोल्हापूर व बीड येथे श्रीगणेशा करुन १३ आॅक्टोबरपर्यंत चोवीस सभा घेणार आहेत़ नगर जिल्ह्यातही एक सभा होणार आहे़ मात्र सभेच्या ठिकाणाबाबत गोपनीयता पाळण्यात येत आहे़ माथुर यांच्यावर राज्याची जबाबदारी असली तरी ते विशेषत: उत्तर महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत करणार आहेत़ संपूर्ण राज्यात यंत्रणा लावल्यानंतर शेवटी नगर जिल्ह्यासाठी शिर्डीत बैठक घेण्यात आली़ आजवर जे मतदारसंघ शिवसेनेच्या किंवा सहयोगी पक्षाच्या वाट्याला होते. तेथे मोठी कुमक पाठवण्यात येणार आहे़
गुजरातचे मंत्री विजय चौधरी हे नगर जिल्ह्याचे प्रमुख असून के ़सी़पटेल हे शिर्डी व भरतभाई हे नगर लोकसभेचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत़ महाराष्ट्रातील नेत्यांचा मोठा मोठा फौजफाटा महाराष्ट्रात ४ आॅक्टोबरपासून सक्रिय होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP's 'Mega Election Plan' for campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.